महादेव बुरुटे यांच्या 'पिंपळवन डॉट कॉम' या बालकादंबरीसह पाच पुस्तकांचे रविवारी प्रकाशनजत/प्रतिनिधी: शेगाव येथील जेष्ठ साहित्यिक, कवी महादेव बी. बुरुटे यांच्या पिंपळवन डॉट कॉम या बालकादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक मा. डॉ. संपतराव जाधव यांच्या हस्ते व तरुण भारत चे मा. शिवराज काटकर, लोकसत्ता चे मा. दिगंबर शिंदे व महाराष्ट्र टाइम्स चे मा. नामदेव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या रविवारी शेगाव येथे होणार आहे. 
        मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव चे २४ ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी २९ आॅगष्ट रोजी चिंच विसावा, शेगांव येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत होत आहे. या संमेलनात, संमेलनाध्यक्ष डॉ. जाधव यांच्या हस्ते या बहुचर्चित व बालवाचकप्रिय ठरलेल्या बालकादंबरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. याच वेळी बुरुटे यांच्या 'गुलमोहोर आणि इतर बालकविता', 'मुले फुले शब्दझुले', 'भुताचं झाड' या तीन बालसाहित्य पुस्तकांचे व शेतीविषयक 'शेतकळा' या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.
        कवी महादेव बुरुटे हे दोन्ही पायांनी पुर्णतः दिव्यांग असून त्यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
Post a Comment

0 Comments