दीपक केदार यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निषेध । दीपक केदार यांना पोलीस संरक्षण द्या; भूपेंद्र कांबळे


जत/प्रतिनिधी: ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावरील मु.पो. सेलू जिल्हा परभणी येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली जिल्ह्याच्या वतीने निषेध करीत. जिल्हा अध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी जत, जत तहसील जत व पोलिस ठाणे जत याना निवेदन देण्यात आले.
        निवेदनात म्हटले आहे की, ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या गाडीवर मु.पो. सेलू जिल्हा परभणी येथे काही समाजविघातक प्रवृत्ती कडून गाडीवर दगडफेक करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून आरोपींना तत्काळ अटक करावी, दीपक केदार यांना पोलीस संरक्षण देण्यात द्यावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत. तसेच या भ्याड हल्ल्यात गाडीमधील भीमराज गोटे हा कार्यकर्ता जखमी झाला आहे. पोलिसांना वारंवार फोन करून सुद्धा पोलिसांनी घटनास्थळी येण्यास विलंब केला.  दीपक भाई केदार हे दि.३०.०७.२०२१ रोजी दिवसभर गंगाखेड, पालम, माजलगाव असा दौरा करून रात्रीचे सुमारास १० वाजता सेलूला मुक्कामासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जात होते. सेलू स्थित येथे एका हॉटेलकडे गाडी नेली असता. आधीच पाळीत ठेवून असणाऱ्या समाजकंटकाच्या हातात कोयता, काठ्या, दगड असे हत्यारे होते. या समाजकंटाकानी त्यांच्या हातातील दगड दीपकभाई केदार यांच्या गाडीवर फेकण्यात आले व भ्याड जीवघेणा हल्ला करण्यात आला. राज्यातील जातीय अत्याचार बाबत भूमिका, सामाजिक, आर्थिक, सांकृतिक, शैक्षणिक प्रश्नाबाबत दीपक केदार हे सतत आवाज उठवत असतात. त्यांचा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून होताना दिसत आहे. तरी या विषयाची सखोल चौकशी होऊन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे.
        यावेळी अमर कांबळे-तालुका अध्यक्ष, गिरीश सर्जे-तालुका उपाध्यक्ष, विकी वाघमारे-तालुका सचिव, सुनिल कांबळे-तालुका कार्यध्यक्ष, प्रमोद काटे-तालुका महासचिव, विक्रांत कांबळे-जत शहर अध्यक्ष, राहुल वाघमारे (बंडा), राहुल ऐवाळे, उमेश कांबळे, सुनिल साबळे, वैभव गंगणे,सुशांत बाबर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments