गुळवंची येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या



जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील गुळवंची येथे श्रीकांत आप्पासो खरात (वय२२ रा.गुळवंची ता.जत) या तरुणाने बुधवारी सकाळी १० च्या सुमारास शेतातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ संभाजी आप्पासो खरात यांनी फिर्याद दिली आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, मृत श्रीकांत खरात हा सकाळी लवकर शेतात पिकास पाणी पाजण्यासाठी गेला होता. सकाळी दहा च्या दरम्यान मयत तरुणाचे काका शेतात पाण्याची मोटर चालू करण्यास गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी लगेच पोलिसांना संपर्क साधला.
       मृत तरुण हा अविवाहित व पदवीधर होता शिक्षण चांगले असूनही नोकरी नाही. हे मयत तरूणाने मनास लावून घेतले असावे त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

Post a Comment

0 Comments