जत नगर परिषदेला वैशिष्टपूर्ण कामांसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त; नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर

२६ कामांसाठी तीन कोटींचा निधी होणार खर्च

जत/प्रतिनिधी: आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जत नगर परिषदेला वैशिष्टपूर्ण कामासाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जतच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर यांनी दिली. आ. सावंत यांनी जतला आतापर्यंत त्यांच्या विशेष प्रयत्नातून सात कोटींचा भरीव निधी मिळवून दिला आहे. त्यातील दोन कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन कोटींच्या कामांचे टेंडर निघाले आहे. जत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आ. सावंत यांनी जत नगर परिषदेला वैशिष्टपूर्ण कामासाठी उर्वरित तीन कोटींचा निधी मिळवून दिला आहे. 

         या तीन कोटीतून शहरातील केशव शिंदे घर ते प्रवीण खोत घर ट्रीमिक्स रोडसाठी सोळा लाख ५० हजार, धनाजी मोरे किराणा दुकान ते श्रावण चौगुले घर रस्ता डांबरीकरण करणे व शेख घर ते राजेंद्र संकपाळ घर रस्ता डांबरीकरण करणेसाठी १३ लाख, महाराणा प्रताप चौक ते कृषी कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे व राजू माळी घर ते हरी जाधव घर ते गुमताज घर ट्रीमिक्स रस्त्यासाठी १४ लाख, आवटी सर घर ते माडगवाळ घर ते शंकर कॉलनी कॉक्रीट गटर करणे व कागवाडे घर ते चन्ननवर घर कॉक्रीट गटारीसाठी १५ लाख, लक्ष्मी गार्डन ओपन स्पेस विकसित करणे (कंपाऊंड व बगीचा) व मातंग समाज मंदिर शोचालय समोर भिंत बांधणेसाठी १७ लाख, मकानदारवाडा समोर ट्रीमिक्स रस्ता करणे व कोळी गल्ली अंतर्गत ट्रीमिक्स रोड व एकबाजू गटर करणेसाठी १६ लाख, अंगडी गल्ली ट्रीमिक्स रस्ता करणे व लक्ष्मी मंदिर ते पखाली घर ट्रीमिक्स रस्ता करणेसाठी १५ लाख. माळकोटगी घर ते फाळके घर ट्रीमिक्स रोड व एकबाजू गटर करणे व चिलखती घर ते अनिल आरळी घर ट्रीमिक्स रोड करणेसाठी १८ लाख, आष्टेकर मळा ते शेगांव रस्ता डांबरीकरण करणेसाठी २० लाख, देवकते घर ते प्रमोद चव्हाण घर काँक्रिट रस्ता करणेसाठी १५ लाख. विलास मोरे घर ते तुकारम शिंगाडे घर रस्ता डांबरीकरण करणे व विजय पाटील घर ते देवकर सर घर कॉक्रीट रोड व एकबाजू गटर करणेसाठी २० लाख, हजीलाल इनामदार घर ते म्हमाणे घर ते साळुंखे घर ट्रीमिक्स रोड व गटर करणेसाठी १२ लाख, दाउद नदाफ घर ते गायकवाड घर रस्ता डांबरीकरण करणेसाठी १० लाख विद्यानगर (आनंदवन) विकसीत करणेसाठी १० लाख, कन्या शाळा ते विलास कुंभार घर व कोळी गल्ली परिसर ट्रीमिक्स रोड व एकबाजू गटर करणे व समर्थ भोजनालय ते बालविद्यामंदिर ट्रीमिक्स रस्ता करणेसाठी २४ लाख ५० हजार, स्टील कॉलनी अंतर्गत डांबरी रोड काँक्रीट गटर करणेसाठी ३० लाख तर जत येथी हिंदू स्मशान भूमी सुशोभीकरण करणेसाठी ३४ लाख असा तीन कोटीचा निधी जत नगर परिषदेला मिळाला असल्याचे नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांनी सांगितले.

         यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते साहेबराव कोळी, जत तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, नगरसेवक नामदेव काळे, निलेश बामणे, महादेव कोळी, अप्पू माळी, अशोक बन्नेनवर, नगरसेवक इराण्णा निडोनी आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments