गुरुदेव कार्यकर्त्यांनी बापूजींच्या विचारांचा ज्ञानदीप कायम ठेवावा;प्राचार्य अभयकुमार साळुंखेजत/प्रतिनिधी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या बापूजींच्या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी बापूजींच्या विचारांचा ज्ञानदीप कायम ठेवावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी राजे रामराव महाविद्यालय जत येथे आयोजित सेवा गौरव व गुणवंत प्राध्यापक सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एस. पाटील हे होते .
        प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलताना म्हणाले की, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानाची विज्ञानाची सांगड घालून सुसंस्कारी विद्यार्थी घडवण्याचे जे कार्य केले आहे ते आपण सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पुढे चालवावे. ऐतिहासिक उदाहरणांचा दाखला देऊन त्यांनी गुरू-शिष्याचे महत्त्व पटवून दिले. राजे रामराव महाविद्यालयातील स्मृतींना उजाळा देऊन सर्वांना प्रेरित केले. सेवानिवृत्त प्राध्यापक आर.डी.करांडे व आर.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडावे व गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा कार्याचा गौरव यावेळी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील बोलताना म्हणाले की, नँकच्या दृष्टीने नव्याने तयार केलेल्या आमराई, फुलपाखरू उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, रोपवाटिका व इतर विविध कामाचा आढावा दिला व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी पीएच.डी. प्राप्त गुणवंत प्राध्यापक मल्लाप्पा सज्जन, ललिता सपताळ, संगीता देशमुख, सौ निर्मला मोरे, सेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कुमारी एम.आर.मुजावर व पीएच.डी. साठी जपान युनिव्हर्सिटी कडून फेलोशिप मिळाल्याबद्दल कुमारी प्रतीक्षा पाटील हिचा सत्कार करण्यात आला.
        या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सेवक राम साळुंखे, कौस्तुभ गावडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब भेंडे पाटील यांनी केले तर आभार डॉ.एस.जी.गावडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments