अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वह्या वाटप; देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रमसांगली: देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करणेत आली. युवासेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे व कुपवाड शहर संघर्ष समितीचे संचालक परवेज मुलाणी यांचे हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणेत आला. यावेळी मान्यवरांचे हस्ते शालेय विद्याथ्र्यांना वाह्यांचे वाटप करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मोहिते यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय आदर्श शिक्षक अनिल मोहिते यांनी केले. तसेच यावेळी सचिन कांबळे व परवेज मुलाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
        यावेळी युवासेना तालुका समन्वयक पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पाटोळे, युवासेना उप तालुका प्रमुख प्रमोद कदम, प्रमोद आवळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments