जीवनात संघर्ष अटळ; उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले

दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या लायन्सच्या विद्यार्थ्यांचा केला सत्कार

जत/प्रतिनिधी: आयुष्यामध्ये सहज आणि सोप्या रितीने कधीच काही मिळत नाही. युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. छोटी स्वप्ने पाहणे हाच गुन्हा आहे. कित्तेक नावारुपाला आलेली माणसे ही संघर्षातूनच मोठी झालेली आहेत. आपण संघर्षाची तयारी ठेवली तर यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी केले. ते लायन्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने आयोजित दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत केले. 
        अध्यक्षस्थानी जतमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व उमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, इच्छा असेल तर मार्ग निश्चितच निघत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश येतच असते. हे आपण स्विकारलेच पाहिजे. तसेच भूतकाळात न जाता वर्तमानकाळात जगले पाहिजे. अशा प्रसंगी आपण आई वडील, गुरुजण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास व श्रद्धा ठेऊन वाटचाल केली पाहिजे. 
        यावेळी शाळेचे व्यवस्थापक डॉ विद्याधर किट्टद यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे स्वागत प्रा तुकाराम सन्नके यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका गीता राठोड यांनी केले. यावेळी काशिलींग शिंगाडे, नेहा कुलकर्णी, तन्वी सांवत, अथर्व कुलकर्णी, पुजा गावडे, श्वेता कोळी, आयमन गुड्डद व क्षितिज सावंत या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
लायन्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीच्या परीक्षेत 100% गुण. यामध्ये अथर्व कुलकर्णी, पुजा गावडे व श्वेता कोळीचा समावेश
         या कार्यक्रमाला शाळेचे परिवेक्षक रामाण्णा तंगडी सर, किरण पाटील, प्राचार्या विद्या सावंत, मुख्याध्यापिका गीता राठोड, पत्रकार इब्राहिम शेख, पांडुरंग कोळ्ळी, पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कोळी यांनी तर आभार शिवराज दुगाणी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments