शेगाव येथे चिंचेच्या झाडांचा साजरा करण्यात आला २१ वा वाढदिवस

प्रल्हाद बोराडे यांच्या "चिंच विसावा" या अॅग्रो टुरिझमला मिळतेय पर्यटकांची साथ

जत- शेगाव येथील चिंच विसाव्यात झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा करताना तुकाराम बाबा महाराज, परशुराम मोरे यांच्यासह वृक्षप्रेमी प्रल्हाद बोराडे , उज्जवला बोराडे आदी.


ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देणारा रांगडा प्रकल्प


जत/प्रतिनिधी: जत सारख्या दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या "चिंच विसावा" या कृषी पर्यटन केंद्रातील चिंचेच्या झाडांचा २१ वा वाढदिवस पर्यावरण व कृषीप्रेमी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी साजरा करण्यात आला. 
       जत तालुका म्हटलं की भयंकर दुष्काळ हे ठरलेलच आहे. याच तालुक्यातील शेगाव येथे, एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणा-या युवकाने पाण्याअभावी शेती करायची म्हणून 20 वर्षांपूर्वी चिंचेची 50 झाडे लावली. हा प्रयोग आता "चिंच विसावा" या कृषी पर्यटन केंद्रात रुपांतरीत झालाय. दुष्काळी भागापुढे या कृषी पर्यटन केंद्रातून नवा आदर्श निर्माण केलेल्या तरुणाचे नाव आहे प्रल्हाद बोराडे. त्यांची सुविद्य पत्नी सौ. उज्ज्वला बोराडेंचीही त्यांना याकामी मोठी साथ मिळतेय.
        “चिंच विसावा" बाबत अधिक माहिती देताना प्रल्हाद बोराडे म्हणाले की, चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्र हे 4 एकर परिसरामध्ये वसले आहे. येथे 105 चिंचेची झाडे व 675 आंब्याची झाडे आहेत. या व्यतिरिक्त लाल जट्रोफा, मधुमालती, बकुळी, जास्वंद, अंजीर, रातराणी, पारिजातक, मोगरा, देशी गुलाब, चिक्कू, मोसंबी, जाई, जुई, ख्रिसमस, पेरू, मोरपंखी, गवती चहा तसेच अनेक फळे व फुलांची झाडे बघण्यास व अभ्यासास मिळतील. असेही बोराडे म्हणाले.
        15 ऑगस्ट 2000 साली 50 चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. याच ठिकाणी चिंच विसावा अॅग्रो टुरिझम साकारले आहे. चिंचेच्या झाडांची लागन करणारे राजाराम शिंदे, झाडांचे पालनपोषण करणारे बोराडे यांचे बंधू संभाजी बोराडे, 'चिंच विसावा'चे प्रमुख प्रल्हाद बोराडे व सौ. उज्ज्वला बोराडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. व केक कापून चिंचेच्या झाडांचा वाढदिवस साजरा झाला.
        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज, जागर फाउंडेशनचे प्रमुख तथा जतचे माजी नगरसेवक परशुराम मोरे, पत्रकार जॉकेश आदाटे, अनिल मदने, गोपाल पाथरुट, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, अविनाश कुलकर्णी सर, ग्रामसेवक बिभीषण सावंत, पत्रकार डॉ. नाना हालंगडे, डॉ. बाळासाहेब मागाडे, सुशांत मागाडे, बंडू वाघमोडे आदी उपस्थित होते. 
Post a Comment

0 Comments