जत शहरात "जागर" व "विक्रम फाउंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला विविध योजनांचा कॅम्प

कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादजत/प्रतिनिधी: जत शहरातील विठ्ठलनगर येथे जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजना नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
        यावेळी बोलताना आ. सावंत म्हणाले की, गेल्या १५ वर्षापासून जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशन निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवत आले आहेत. कोरोनाच्या कठीण काळात सर्वसामान्य गरजू नागरिकांना मदत करण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देण्याचे चांगले काम जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशनने केले आहे. तसेच या कॅम्पमध्ये
आयुष्यमान भारत योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन कार्ड लॅमिनेशन, असे निरनिराळ्या योजनेचे कॅम्प लावून चांगला उपक्रम राबवला आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन आमदार सावंत यांनी केले.
        यावेळी जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे व विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड युवराज निकम म्हणाले की, शासकीय योजनांची विविध माहिती व त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना जागेवरच मिळावा यासाठी या योजनांचा कॅम्प जत शहरात सुरू केला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन परशुराम मोरे व युवराज निकम यांनी केले आहे.
        यावेळी जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. युवराज निकम, यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी, जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे, युवा नेते फिरोज नदाफ, नगरसेविका वनिता साळे, सिद्धू जाधव, मच्छिंद्र कांबळे, विकास बनपट्टे, बापू सूर्यवंशी, पांडूरंग सूर्यवंशी, धिरज मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments