जत येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनजत/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरलेबाबत मंत्री नारायण राणे यांचा शिवसेना, युवासेना जत तालुक्याचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारुन दहन करण्यात आले.
        यावेळी बोलताना युवा सेना जत तालुका पश्चिम विभाग प्रमुख सचिन मदने यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची काम करण्याची पद्धत खूप चांगले आहे. ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र असे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. विरोधकांना त्यांचे काम डोळ्यात खुपत आहे. आणि भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्याच्या हेतुने नारायण राणे हे माथेफिरूसारखे वक्तव्य करत फिरत आहेत.
        शिवसेना नेतृत्व हे संयमी आहे. आजपर्यंत काहीही झाले तरी शिवसेना सबुरीने घेत आहे. याचा अर्थ असा नाही की कायपण कराल व बोलाल आणि ते शिवसैनिक सहन करेल. शिवसेना ही कडवट शिवसैनिकांची फौज आहे. त्यांच्यासारखी लाळघोटेपणा करणारी गद्दार लबाड लांडग्याचा कळप नाही. आता जशाच तसे उत्तर दिले जाईल. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय सावंत,तालुका संघटक अमित दुधाळ, विजयराजे चव्हाण ,जत शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ, सरचिटणीस रोहित पाचंगे, शिवसेना जेष्ठ नेते दिनकर पतंगे आदी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments