जत मधील अंगणवाडी सेविकांनी त्यांचे शासकीय मोबाईल शासनाला केले परत!


जत/प्रतिनिधी: पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०१९ मध्ये राज्यांतील १,०५,५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. सदर मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे कालावधीची असून तो कालावधी मे २०२१ मध्ये संपला आहे. सदर मोबाईला २ जीबी रॅम आहे. मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्यामुळे व त्यांत भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होऊन गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठिण जाते. सदर मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाल्यामुळे सतत नादुरूस्त होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४ हजार रु. खर्च होतो व तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो. महाराष्ट्रात हजारो मोबाईल बिघडलेले आहेत व ३००० पेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले आहेत.
         या परिस्थितीत जत मधील सर्व अंगणवाडी सेविकांनी दि. २३.८.२०२१ पासून मोर्चाने प्रकल्प कार्यालयात जावून सर्व मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जत मधील सर्व अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करण्यात आले आहेत.
        यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे, कार्याध्यक्ष सुर्यमनी गायकवाड, जिल्हासचिव नाझिरा नदाफ, माधुरी जोशी, सत्यव्वा रेड्डी, शैला पाटील, विमल सावंत, हसीना मकानदार यांच्यासह तालुक्यातील असंख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments