निगडी खुर्द येथे युवकाचा निर्घृण खून । जत पोलिसात गुन्हा दाखलजत/प्रतिनिधी: निगडी खुर्द ता. जत येथे तुकाराम शिवाजी ताटे (वय ३३, रा. शेगाव) या युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम ताटे हे मूळचे शेगाव (ता. जत) येथील रहिवासी असून त्यांची जमीन निगडी खुर्द येथे आहे. निगडीपासून दोन किलोमीटर अंतरावरून शेतात एक घर आहे. या ठिकाणी तुकाराम येऊन राहत होता. दरम्यान सोमवारी सायंकाळी तुकाराम यांचा मृतदेह घरात आढळून आला. तुकारामा यांच्या अंगावर ठिकठिकाणी धार-धार शास्त्राने जखमा केल्याचे दिसून येत आहे. तसेच घरातील साहित्याची तोडफोड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळावरून मायताचा मोबाईल व चार चाकी स्कॉर्पिओ क्र. एम् एच १० सी ए ७६९१ ही गाडी गायब आहे. या घटनेची फिर्याद नामदेव शिवाजी ताटे वय ४० रा. शेगाव यांनी जत पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी करत आहेत.

Post a Comment

0 Comments