जतमध्ये गरजू कुटुंब, तृतीयपंथी व देवदासी महिलांना जिवनावश्यक किटचे वाटप

कोरो इंडिया व सहयोग फौंडेशनचा उपक्रम


जत/प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील कोरो इंडिया संस्था व जत तालुक्यातील अचकनहळळी येथील सहयोग फौंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील जत, देवनाळ, अचकनहळळी, निगडी येथील गरजू कुटुंब, तृतीयपंथी व देवदासींना महिनाभर पुरेल इतक्या जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. तालुक्यातील तृतीयपंथी व देवदासी यांचेही हाल सुरू आहेत. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी  मुंबई येथील कोरो इंडिया ही संस्था पुढे सरसावली व सहयोग शोशल फौंडेशन, अचकनहळळी यांच्या माध्यमातुन अचकनहळळी, निगडी, जत व देवनाळ या गावातील सुमारे पन्नास गरजू कुटुंब व जत तालुक्यातील तृतीयपंथी व देवदासी महिलांना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा माल देण्यात आला.
       यावेळी सहयोग सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, सुरज मनेर, जोतिराम सावंत , बिसलाप्पा कोरे, सिद्धनाथ ऐवळे, दाजी केंगार, संतोष हाक्के, नामदेव केंगार, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments