जत येथे सुझलॉन पवनऊर्जा कंपनीचे काम शेतकऱ्यानी पाडले बंद

 


जत/प्रतिनिधी:

      जत शहरातील विठ्ठलनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नारू मळा येथे गेल्या वर्षी जून महिन्यात वादळी वाऱ्याममध्ये लाईटचे खांब वाकले व त्यावरील सुरक्षा तार तुटून शेजारी असणाऱ्या घरावर पडली होती. ही माहिती कळताच जत नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे सदरची विजेची लाईन बंद करण्यात आली. तेथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जो पर्यंत जमीनीच्या खालून विद्युत तारा घेतल्या जात नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर सदर लाईटीचे काम जमिनीतून करावे, अशी मागणी जत तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली होती. तहसीलदार यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून असे सांगितले होते की, जिथे पर्यंत लोकवस्ती आहे. तिथे पर्यंत जमीतून लाईटचे काम करा असे सांगितले. पण सुझलॉन कंपनीने तसे न करता फक्त अर्धे काम आम्ही करणार. आता आम्हाला तेवढेच साहित्य आले आहे. असे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यावेळी सांगितले. पण तेथील शेतकरी हे त्यांच्या मतावर ठाम आहेत. काम करायचं असेल तर लोकवस्ती जिथे पर्यंत आहे. तिथे पर्यंत काम पूर्ण करा अन्यथा आम्ही काम करू देणार नाही. असे म्हणत शेतकऱ्यांनी काम बंद पाडले.  • अन्यथा लाईन बंद करू- शेतकरी सदाशिव कांबळे
  •        सुझलॉन पवनऊर्जा कंपनीने लोकवस्ती जेथे  पर्यंत आहे तिथे पर्यंत काम पूर्ण करावे. अन्यथा आम्ही लाईन चालू करू देणार नाही. असा इशारा शेतकरी सदाशिव कांबळे यांनी दिला आहे. सुझलॉन पवनऊर्जा कंपनी ही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून शेतकऱ्यांना बेदखल केले जात आहे. सुझलॉन पवनऊर्जा कंपनीने आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जत तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू.


  • सुझलॉन पवनऊर्जा कंपनीने मनमानी बंद करावी; परशुराम मोरे-
  •        सुझलॉन पवनऊर्जा कंपनी ही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. सुझलॉन पवनऊर्जा कंपनीने शेतकऱ्यांवर केलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही.

Post a Comment

0 Comments