इंग्लंड मधून जत साठी बायपॅप व्हेंटीलेटर उपकरणे भेटजत/प्रतिनिधी: युथ फॉर जत या सामाजिक संस्थेकडून जत ग्रामीण रुग्णालय जत व जीवनरेखा रक्तपेढी जत यांना बायपॅप व्हेंटिलेटर उपकरणे रविवार, दिनांक २७ जून २०२१ रोजी भेट देण्यात आली. इंग्लंड मधील भारतीय बांधवांनी आपल्या मात्रूभूमीसाठी हि मदत पाठवली आहे.  

        बायपॅप व्हेंटिलेटर हे अत्याधुनिक उपकरण असून कोरोना बाधित रुग्णांना तसेच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरते.

        ग्रामीण रुग्णालय साठी उपकरण चे वितरण आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. ग्रामीण रुग्णालय चे अधीक्षक डॉक्टर संजय बंडगर यांनी त्याचा स्वीकार केला. 

         दुसरा संच जीवनरेखा रक्तपेढी यांना एका कार्यक्रम मध्ये देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जत च्या वैद्यकीय क्षेत्रामधील विविध मान्यवर, डॉ कैलास सनमडीकर , डॉ मनोहर मोदी, डॉ सी बी पवार, डॉ विजय पाटील व युथ फॉर जत चे अध्यक्ष दिनेश शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव अमित बामणे यांनी केले. सचिन जाधव यांनी उपकरण वितरित करण्या मागची संस्थेची भूमिका मांडली. या उपकरणांनाचा वापर कोरोना च्या पुढील लाटे मध्ये तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरवताना होईल अशी आशा डॉ सनमडीकर यांनी यावेळी व्यक्त केली. आभार डॉ विजय पाटील यांनी मांडले. कार्यक्रम ला डॉ राऊत, डॉ हरीश माने, डॉ मलबादी तसेच युथ फॉर जत सदस्य प्रदीप साळुंखे व प्रमोद साळुंखे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments