विठ्ठलनगर येथील लसीकरण केंद्रस चांगला प्रतिसाद

लसीकरणास जागर फाउंडेशनचे सहकार्य


जत/प्रतिनिधी: जत शहरातील विठ्ठलनगर येथे लसीकरण केंद्रस चांगला प्रतिसाद. शहरातील विठ्ठल नगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रास महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. या लसीकरण केंद्रावर आज आखेर 253 जणांनी लस घेतली आहे. लसीकरण केंद्राचे उद्घाटन तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

         यावेळी बोलताना तहसीलदार सचिन पाटील म्हणाले की, कोरोनावर सर्वांनी मिळून मात करूया, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, लसीकरण करून घेणे आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी गरजेचे आहे. असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

         यावेळी बोलताना जागर फाउंडेशन संस्थापक तथा माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे म्हणाले की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी लस घ्यावे. लस ही सुरक्षित असून विठ्ठलनगर येथील नागरिकांनी लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जागर फाउंडेशनच्या वतीने जनजागृती मोहीम आयोजित करणार असल्याचे परशुराम मोरे म्हणाले.

          यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, जागर फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे आदी जण उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments