विद्यार्थ्यांना फी भरण्यास सक्ती केल्यास रस्त्यावर उतरू; जत विद्यार्थी काँग्रेसचा इशाराजत(जॉकेश आदाटे): विद्यार्थ्यांना फी भरणेबाबत सक्ती न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून देखील काही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुल करत आहेत. जर विध्यार्थी फी भारत नाहीत तर त्यांचे परीक्षा फार्म महाविद्यालयाकडून स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे.
        सक्तीने वसूल करण्यात येत असलेली फी थांबवण्यात यावी, याबाबतचे निवेदन जत विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जत तहसीलदारसो याना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन वर्षे राज्यात कोरोनाचे महाभयंकर संकट सुरू आहे. यामुळे सर्व महाविद्यालय गेली दोन वर्षे बंद आहेत. पण विद्यार्थीचें शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अश्याच पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू आहेत. परंतु सध्या जिल्ह्यातील महाविद्यालय ऑनलाईन शिक्षण सुरू असताना महाविद्यालय इतर फी ची सक्ती करत आहेत. जागतिक संकटात सर्वच समाज घटक भरडून गेला असताना ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नाही, त्या सुविधांची फी सक्ती करणे ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. सध्या महाविद्यालयात परीक्षा फॉर्म भरण्याची लगबग सुरू असून, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालय विद्यार्थीना सर्व फी भरा, अन्यथा परीक्षा फॉर्म भरून घेतले जाणार नाहीत. अशी सक्ती करत आहेत. विद्यार्थ्यांना अशी सक्ती कोणी करू शकत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाहीत. असे जर कोणते महाविद्यालय सक्ती करून विद्यार्थ्यांना वेठीस धरत असेल तर विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून, विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढा उभारू. असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
         यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास माने, आकाश बनसोडे, नोमान नदाफ, विशाल कांबळे, महादेव चव्हाण, आशुतोष ऐवळे, सचिन हेगडे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments