पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करता धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

नदी काठच्या गावातील ग्रामस्थ,शेतकरी यांनी सतर्क रहावे


सांगली: सांगली येथील आयर्विन पुलाचा पातळी आज दुपारी 2 वा. 39 फुट असून ती ओसरत आहे.  धरणातील सध्याचा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करुन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणी पातळीत 1 ते 2 फुटांची वाढ होऊ शकते. त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे
सध्यस्थितीत कोयना धरण 86 टक्के भरले असून 48 हजार 931 क्युसेस विसर्ग होत आहे. धोम धरण 79 टक्के भरले असून 3 हजार 594 क्युसेस विसर्ग सुरु आहे. कण्हेर धरण 79 टक्के भरले असून 4 हजार 94 क्युसेस विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरण 75 टक्के भरले असून 2 हजार 919 क्युसेस विसर्ग सुरु आहे. 
        त्यामुळे सध्याच्या पाणी पातळीत त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2309525 या संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments