मराठा आरक्षणा संदर्भात आमदार विक्रमसिंह सावंत यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन। विधिमंडळात भूमिका मांडण्याबाबत केली चर्चाजत/प्रतिनिधी: संभाजी ब्रिगेड मराठा ओबीसी करणाचा लढा गेल्या तीस वर्षापासून लढत आहे. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या आदेशानुसार आज जत येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देऊन संभाजी ब्रिगेडच्या ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मराठा समाजाचे ओबीसी करण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, मा. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.

या सर्व मागण्यांसह मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलणे आवश्यक आहे. मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मराठा समाजातील नोकरीस पात्र 2185 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. हा तरुणांचा प्रश्न आहे. या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण तरुणांचे प्रश्न सोडवाल ही अपेक्षा आहे. तरी वरील विषय आपण समजून घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडावी. जत विधानसभा मतदार संघाचे आपण लोकप्रतिनिधी आहात. समाज आपल्याकडून मोठी अपेक्षा ठेऊन बसला आहे. आपण विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडावी. जर या वेळी मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळ अधिवेशनात आपण भूमिका मांडली नाही तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल होणार्या परिस्थितीस स्वत: लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असे निवेदनात म्हटले आहे. 

      तसेच जत येथील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गेली १४ वर्षे रखडलेल्या पुतळ्याचे काम त्वरित करावे असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक बोलताना म्हणाले. यावेळी संभाजी ब्रिगेड जत तालुका उपाध्यक्ष रोहित चव्हाण, बेवनूरचे उपसरपंच विजयकुमार नाईक, दिपक पाटणकर, शहराध्यक्ष प्रमोद काटे, तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे, संदिप नाईक, मल्लिकार्जुन कोळी, इर्शाद तांबोळी, वैभव पवार, आकाश कदम, युवराज कोडग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments