इंधन दरवाढीविरोधात जत युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीमजत/प्रतिनिधी: इंधन दरवाढीविरोधात जत युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आले. शहरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे आ. मोहनशेठ कदम, जत मतदारसंघाचे आ. विक्रमसिंह सावंत यांनी स्वाक्षरी करीत इंधन दरवाढविरोधी मोहिमेत सहभाग घेतला.
         केंद्र सरकारविरोधात नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. आमदार विकमसिंह सावंत म्हणाले, मोदी सरकार हुकूमशाही आहे. पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्यांची लूट करीत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून ३५ ते ४० टक्के लूट होत आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपची मंडळी सातत्याने किरकोळ दरवाढीविरोधात आंदोलन करीत होती. त्या वेळेस किमती अगदी मर्यादित होत्या. मात्र, आता कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी असतानासुद्धा मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरात भरमसाट वाढ केली आहे. त्यावेळी आंदोलन करणारे आता मूग गिळून का बसले आहेत.
          यावेळी काँग्रेस अध्यक्ष विकास माने, सुजय शिंदे, नगरसेवक साहेबराव कोळी, मा.नगरसेवक परशुराम मोरे, सलीम पाच्छापुरी, मारुती पवार, गणेश गिड्डे, सतीश कलाल, राजू यादव, राहुल काळे, आकाश बनसोडे, मिथुन माने, रमेश कोळेकर, अप्पु माळी, बाळू बामणे, राजु जेऊर, गंगाधर कलाल आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments