तालुक्यातील विविध प्रश्नासमबंधी आ.सावंत यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची घेतली भेट


जत/प्रतिनिधी: जत तालुक्याचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जत तालुक्याच्या पूर्व भागास कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी मिळण्यासाठी कर्नाटक सरकार बरोबर करार करणे विषयी विनंती केली. तसेच तालुक्यातील विविध विभागातील रिक्तपदांची माहिती देऊन त्या रिक्त जागा भरणे बाबत पत्र दिले. जत तालुक्याचे विभाजन, जत येथील दिवाणी न्यायालय इमारत बांधकाम, जत उमदी येथील पोलीस निवासस्थान बांधणे. जत येथील ट्रामा केअर सेंटर सुरु करणे, क वर्ग भटक्या धनगर  समाजबांधवांसाठी 23 योजना असून त्या योजनेस निधीची मागणी करण्यात आली. यासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.

         त्याच बरोबर यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटी  अध्यक्ष अप्पाराया बिरादार, जत पंचायत समिती माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत तालुका कॉंग्रेस कमिटी कार्यध्यक्ष सुजय शिंदे, दान्नम्मा दुध संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments