कायद्याच्या विद्यार्थ्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून द्यावा; अॅड.गजाननराव पुंडकर

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय पदवी आणि पदव्युत्तर विभागाचा पदवीदान सोहळा संपन्न 


कायद्याचे विद्यार्थी हेच खरे समाजातील घटकाला न्याय मिळवून देऊ शकतात त्यामुळे तळागाळातील सर्वांपर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांची आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडावे असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.गजाननराव पुंडकर यांनी केले ते डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या पदवीदान कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
        पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची स्थापनेचे हे 75 वे वर्ष असून कोरोना संक्रमण आणि इतर बाबी लक्षात घेता हा कार्यक्रम शनिवार दिनांक 17 जुलै रोजी  ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.गजाननराव पुंडकर होते कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री दिलीप राव इंगोले आणि प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक श्री मुरलीधर वाडेकर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती चे कायदा विभागाचे अधिष्ठाता श्री विजय कुमार चौबे, प्राचार्य अंजली ठाकरे उपस्थित होत्या.
         कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे गीताने करण्यात आली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय ही मिळणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्री विजय कुमार चौबे यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी केले महाविद्यालयाची यशाची परंपरा भविष्यामध्ये सुद्धा कायम राहील अनेक माजी विद्यार्थी देशातील विविध ठिकाणी न्यायाधीश म्हणून सेवा देत आहेत. ख्यातनाम विधिज्ञ म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे डॉ. देशमुख या महाविद्यालयाच्या पहिल्या महिला प्राचार्य आहेत.
      या कार्यक्रमात एल एल बी व एल एल एम अंतिम परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदके आणि पदवी प्रदान करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले ऋषी छाबडा यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की त्यांच्या यशामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच प्राचार्य, सर्व प्राध्यापक यांचा मोठा वाटा असून या महाविद्यालयाचे संस्कार आयुष्यभर एका ध्येयाप्रती लढण्याची शक्ती देतील. यावेळी एल एल बी मध्ये पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची नावे अनुक्रमे माजी प्र.प्राचार्य प्रा. डॉ.मालवीय, डॉ.राजेश पाटील यांनी वाचुन दाखविली, पदव्यूत्तर पदवी एल एल एम मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे प्रा. डॉ.प्रकाश दाभाडे यांनी वाचन केले.
        कार्यक्रमांमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सुवर्णपदक ऋषी अमरजित छाबडा, हर्षल बांबल, अनुश्री भंडारी रोप्यपदक कु.पलक ध्यानचंद चटवाणी, कु. रानी अनिल पवार, कु. चैताली रमाकांत हाटे कास्यपदक गोपाल  मोटवाणी, कु. प्रीती अशोक खंडेलवाल, अशोक तिर्थराज विश्वकर्मा यांनी अनुक्रमे तीन वर्षीय पाच वर्षीय एल एल बी अभ्यासक्रम व एल एम मध्ये प्राप्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची कडू मॅडम व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संजय भोगे सर यांनी केले.
          यावेळी कार्यक्रमाला डॉ. एस.एच.भोगे, यु. व्ही.ठाकरे, डॉ. पी. आर.मालवीय,डॉ. बी. ए.देशपांडे, डॉ. एन के रामटेके, डॉ. आर एस काळे, डॉ. डी एच लोखंडे, डॉ आर जी पाटील, प्रोफेसर एम यु इंगोले, प्रोफेसर सी ए घुगे, डॉ. पी वाय दाभाडे,डॉ राधिका देशमुख, नरेंद्र भिसे,विजय देशमुख,राजेश बभूतकर,मनोहर सुने,रणजीत देशमुख,गौरी पावळे,प्रवीणगावंडे,श्रीकृष्ण कडू सह शिक्षकेतर कर्मचारी व आयोजन समिती सदस्य अफरोज खान,गायत्री जगताप,अद्वैत चव्हाण,सय्यद ऊजैर हुसेन,श्रीया केतकर,श्रेया शाह,रोशनी परमार,निकिता टावरी, साहिल आरख उपस्थित होते.  

*महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण-
कोरोणा संक्रमण काळ आणि प्रशासनाची बंधने असल्यामुळे ह्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून हा कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल. अशा प्रकारचे थेट प्रक्षेपण  महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच होत असल्याने याची मोठी जबाबदारी अफरोज खान,अद्वैत चव्हाण,सय्यद ऊजैर हुसेन यांच्याकडे देण्यात आली. या कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाचे अधिकृत सोशल मिडीया च्या माध्यमातून यशस्वीपणे करण्यात आले. या थेट प्रक्षेपणाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. या ऑनलाईन प्रक्षेपण कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments