शेतकरीवर्गाने जमिनीचे माती परिक्षण करून पिके घ्यावीत; कृषीदूत सुरज मोरेजत/प्रतिनिधी: दुष्काळी जत तालुक्यातील शेतकरीवर्गाने जमिनीचे माती परिक्षण करून पिके घ्यावीत व उत्पादन क्षमता वाढवावी असे आवाहन कृषीदूत सुरज लक्ष्मण मोरे यानी केले आहे.  
       महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज या महाविद्यालयातून आलेले कृषीदूत सुरज लक्ष्मण मोरे यानी जत येथे माती परिक्षणाबध्दल शेतक-यांमध्ये जनजागृती केली. अकलुज येथिल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहीते-पाटील, समन्वयक डाॅ.डी.पी.कोरटकर, प्राचार्यआर.जी.नलवडे, प्रा.एस.एम.एकतपुरे, प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदूत सुरज मोरे यानी शेतक-यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविले.
        यावेळी बोलताना मोरे म्हणाले, माती परिक्षणाचा मूळ उद्देश हा जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे. ते तपासणे व ती कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे अवश्यक आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन केले. रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषीदूतानी जमिनीतून मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणत्या ठिकाणी घ्यावा, कोणत्या ठिकाणी घेऊ नये त्याचप्रमाणे मातीची उत्पादकता कशी वाढवावी, अवश्यक अन्नद्रव्ये कोणती व त्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे कोणती या विषयी मार्गदर्शन केले. 
       यावेळी सुरेश पवार, अमोल पवार, सोपान वगरे, सतिश पवार, भाऊ गावडे, शरद पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments