जत निगडी रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपांना बगल; उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या कामाचे कौतुक
जत/प्रतिनिधी: जत निगडी रस्त्या लगत दोन्ही बाजूस काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणात वाढले होते. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली होते. ही बाब जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी शहरातील निगडी कॉर्नर ते घनकचरा डोपो तोपर्यंतच्या दोन्ही बाजूची काटेरी झुडपे काढून टाकल्याने विठ्ठल नगर परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
         जत निगडी रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झुडपंना काढण्याचे काम हे प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या निदर्शनास आल्याने व या काटेरी झुडपांमुळे लहान-मोठे अपघात होत असल्याने, ही काटेरी झुडपे काढणे आवश्यक होते, ही बाब उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी ही काटेरी झुडपे बाजूला करत जत-निगडी रस्त्यांना मोकळा श्वास दिला. या कामामुळे जत-निगडी रस्त्यालगत असलेल्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments