जत पोलीस ठाण्यातील दोघांना बढती; पोलीस निरीक्षक कोळी यांनी केला सत्कारजत/प्रतिनिधी: जत पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बढती मिळाली असून. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील सर्व बढत्या जाहीर केल्या होत्या. जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी प्रशांत गुरव यांची पोलीस नाईक वरून पोलीस हवालदार, तर वहिदा मुजावर यांची पोलीस नाईक वरून पोलीस हवालदार पदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते, विनोद कांबळे, पोलीस नाईक उमर फकीर, पोलीस हवालदार हरीश जवंजाळ आदीजण उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments