खिलारवाडी खून प्रकरण । मामानेच केला भाच्याचा खून; जत तालुक्यातील घटना; तिघांना अटक तर एक जण फरार


जत/प्रतिनीधी:

     खिलारवाडी ता.जत येथील नाना शिवाजी लोखंडे (वय-35) या तरुणाचे मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. परंतु त्यांने आपल्याच दुसऱ्या एका चुलत मामाच्या मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून नाना लोखंडे यास पळवून नेऊन कर्नाटकात विजापुर जवळ तोरबी येथे नेऊन मामा नेच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाना लोखंडेला त्याच्या मामाने सांगलीतील एका ठेकेदाराकडे दिवानजी म्हणुन कामाला लावला होता. तरी पण मयत नाना लोखंडे हा त्याचा मामा अर्जुन लोखंडे यांच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. या बाबत नानाला समज ही दिली होती. मंडळीनी समजुन सागुंन नानाला खिलारवाडीत पाठवले होते. काही दिवस गप्प बसल्या नतंर नानाने मामाच्या पोरीला पळवुन आणले. त्यनंतर अर्जून शिंदे यांनी नानाचा काटा काडायचे ठरलवले. 22 जुन रोजी चार चाकी गाडीतुन येऊन नाना लोखंडेचे अपहरण करत, चालत्या गाडीतच गळा दाबून खून केला व विजापुर येथील एका ओढ्यात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून तो मेला आहे का याची खात्री करून तेथुन धुम ठोकली. ज्या दिवशी नाना लोखंडे गायब झाला त्या दिवसापासून नानाचा मामा अर्जून गायब झाला. त्या मुळे पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. व याच संशयावरून त्याच्या मामास ताब्यात घेतले व जेरबंद केले. 

         याप्रकरणी जत पोलिसांनी अर्जुन महादेव शिंदे (वय ४० रा.अभिनंदन कॉलनी, संजयनगर), जगन्नाथ बाळ आप्पा लोखंडे (वय २३ रा. खिलारवाडी ), विनायक बाळासाहेब शिंगाडे (वय .२१ रा.सुभाषनगर) या तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. याबाबतची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

         सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सपोनि महेश मोहीते, सपोनि संजय क्षिरसागर, पोउपनि युवराज घोडके, सचिन हाक्के, उमर फकीर, बजरंग थोरात, अमोल चव्हाण, प्रशांत गुरव, पोना राज सावंत, प्रकाश पाटील, नलवडे, योगेश पाटोळे, शरद शिंदे, केरबा चव्हाण, विशाल बिले, प्रशांत खोत, रोहीत कोळी व चापोहेका राजेंद्र पवार यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी जत पोलिसांचे कौतुक केलं आहे.

गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांची दमछाक-

नातेवाईकांनी तपास कामात सहकार्य न केल्यामुळे पोलिसांच्या हाताला कोणताच पुरावा लागत न्हवता. त्यामुळे आरोपी पर्यंत पोहचणे हे जत पोलिसांसाठी आव्हान बनले होते. अत्यंत गुंतागुंतीचा असलेल्या या तपास पोलिसांनी गुन्ह्यातील अनेक बारकावे लक्षात घेऊन तपासाची गती वाढवली. तर एका आरोपीला जत पोलिसांनी तेलंगणा येथील मेहबूबनगर मधून अटक केली आहे.

नाना लोखंडे खुन करेल या भितीने मामाने च केला खुन-

मयत नाना लोखंडे हा त्याच्या मामाला वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होता. तो खुन करेल या भितीने नानाचा मामा अर्जुन शिंदे याने त्याचा काटा काडण्याचा निर्णय घेतला आणी अर्जुन ने त्याच्या साथीदाराच्या मदतीने नाना लोखंडेचा खुन केल्याची कबुली दिली.

Post a Comment

0 Comments