जत/प्रतिनिधी: सांगलीत आलेल्या महापुराने सांगलीत सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली येथे 2019 सलाप्रमाणे याहीवर्षी जत येथील जागर फौंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात अली. जागर फौंडेशनचे संस्थापक व जत नगर परिषदेचे माजी सभापती परशुराम मोरे यांच्यासह सुमारे 40 स्वयंसेवक आपला जीव धोक्यात घालून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
यावेळी मोरे म्हणाले की, सामाजिक कार्यात जागर फौंडेशनची टीम निस्वार्थपणे काम करते. जत शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी जागरफौंडेशने स्वच्छता मोहीमेबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळातही मागील दीड वर्षांपासून जागर फौंडेशनचे काम सुरूच आहे.
2019 मध्ये सांगलीमध्ये महापूर आला होता. त्यावेळीही जागर फौंडेशनच्या टीमने सांगलीत रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबविली होती. याही वर्षी सांगलीत महापूर आला व जागर फौंडेशनची टीम सांगलीत दाखल झाली आहे. सांगलीतील कर्नाळ रोड व जाम वाडी परिसर येथे 40 स्वयंसेवकांच्या टीमसह स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी जागर फाउंडेशनने केलेल्या कामाचे कौतुक केले व आभार मानले.
0 Comments