निगडी खुर्द खून प्रकरणातील चौघां आरोपींना ठोकल्या बेड्या ; एक फरारी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई


जत/प्रतिनिधी: निगडी खुर्द येथे मयत तुकाराम ताटे खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे ठोकल्या बेड्या. 
         सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी गु.घ.ता वेळ दिनांक २६.७.२०२१ रोजी ची निगडी ते बनाळी जाणारे रोडलगत मयताचे शेतात झाला होता. याबाबत जत पोलीस ठाण्यात भाऊ नामदेव शिवाजी ताटे रा,शेगाव ता जत जि सांगली यांनी फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळवत  सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, जितेंद्र जाधव, राजु मुळे, संजय काबळे, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, यांच्या पथकाने चक्रे फिरवत आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले आहे. 
          यामध्ये आरोपी सुरेश कारभारी हिरगोड वय ३० रा ठरवडी ता मुळशी जि पुणे,अनिल सुरेश काळेल वय २९ रा रा उरवडी ता मुळशी जि पुणे,रामेश्वर निळकंठराव जोगदंड वय ५४ रा उरवडी ता मुळशी जि पुणे (मुळ गाव नरवडी ता सोनपळे जि परभणी,तानाजी रावसाहेब जाधव वय ४५ रा, निगडी खुर्द ता जत जि सांगली, विजय कराळे रा.उरवडी ता मुळशी जि पुणे हा पसार झाला आहे.
         अधिक माहिती अशी की, दिनांक २६.४.२०२१ रोजी ०४.३० दरम्यान जत पोलीस ठाणे हदीत निगडी खुर्द ता जत गावचे होत निगडी ते बनाळी जाणारे रोडलगत मयत तुकाराम ताटे यांचे शेतातील घरात अज्ञात इसमानी अज्ञात कारणा वरुन मयत तुकाराम ताटे याचा धारदार हत्याराने छातीवर पाठीवर पोटावर उजव्या हाताचे मनगटावर हाताचे पंज्यावर बोटावर डावे हाताचे दंडावर,गुडघ्यावर वार करून त्याचा गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याबाबत जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
         दिनांक २६.७.२०२१ रोजी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी सपोनि रविराज फडणीस व त्यांचा टीमने जत पोलीस ठाणे हद्दीत निगडी खुर्द ता जत गावचे हदीत निगडी ते बनाळी जाणारे रोडलगत झाले गुन्ह्यांच्या ठिकाणी भेट देऊन योग्य तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे सपोनि रविराज फडणीस व पोलीस टीमने गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून  ठिकाण पाहता निगडो गावापासून दोन देवून सदरचा गुन्हा उघडकीस किलोमिटर अंतर असून सदर मयतेचे घरो मयत हा एकटाच राहत असून त्याचे शेजारी कोणतीही वस्ती नसुन काणताही पुरावा नसताना तपास करणं अवघड़ होते. त्यावेळी स्थानिक अन्वेषण शाखा कडील सपोनि रविराज फडणीस व त्याचा टीम यांनी पुढील गुन्हयाचा तपास चालु केला असता, सपोनि फडणीस यांनी मयत  तुकाराम ताटे याची मागील गोपणीय माहिती घेतली असता, त्यांना माहिती मिळाली की मयत  तुकाराम ताटे याचा काही दिवसापूर्वी तानाजी जाधव निगडी खुर्द ता जत जि सांगली याचे कडे विजय कराळे हा त्याचे आयशर टेम्पो घेऊन कामानिमित्त आला होता, त्यावेळी तानाजी जाधव याचे शेतात विजय कराळे हा याचा आयशर टेम्पो अडकला व तो बाहेर निघत नव्हता त्यावेळी तानाजी जाधव, विजय कराळे यांनी मयत  तुकाराम ताटे याचे मालकीच्या शेतातुन माती काढून त्या आयशर टेम्पो अडकला त्या ठिकाणी मयत तुकाराम ताटे यास न विचारता टाकले म्हणून याचमध्ये जोरदार त्याचा वाद झाला होता. या अनुषगाने सपोनि रविराज फडणीस यांनी तपास केला असता संशयीत म्हणून तानाजी जाधव यांना ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्याने आपले नाव तानाजी रावसाहेब जाधव वय ४५ रा. निगडी खुर्द ता जत जि सांगली असे सांगितले त्याचे कडे सदर गुन्हयाचं अनुषंगाने चौकशी केली असता त्यानी सांगितले काही दिवसापूर्वी विजय कराळे हा याचा आयशर टेम्पो माझ्या कडे आला होता त्यावेळी माझा, विजय कराळे याचा वाद मयत तुकाराम ताटे याचे सोबत झाला होता, याचा राग मनात धरुन विजय कराळे यांनी त्यांनी त्याचे मित्रास बोलावून त्याचा खुन केला असल्याचे सांगितले व विजय कराळे याचे मित्र हे उरवडी ता मुळशी जि पुणे येथे असल्याचे सांगितले त्याप्रमाणे सपोनि रविराज फडणीस व त्याचा स्टाफ हे उरवडी ता मुळशी जि पुणे येथे जाऊन या तिघांना ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्यानी आपले नाव १) सुरेश कारभारी हिरगोड वय-३० रा, उरवडी ता मुळशी जि पुणे २) अनिल सुरेश काळेल वय २९ रा. रा. उरवडी ता मुळशी जि पुणे ३) रापेश्वर निळकंठराव जोगदंड वय ५४ रा, उरवडी ता मुळशी जि पुणे (मुळ गाव नरवडी ता सोनपळे जि परभणी ) असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्या तिघांना सपोनि रविराज फडणीस यांनी त्याचे कडे खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने चाकशी कली असता त्यांनी सांगितले की, मित्र विजय कराळे रा,उरवडी ता मुळशी जि. पुणे यांचा वाद मयत तुकाराम ताटे रा जत निगडी खुर्द जवळ वाद झाला असे सागितलं यावरुन त्याचा राग मनात धरून मित्र विजय कराळे व आम्ही सर्वांनी मिळून त्याचा खून केला असल्याचे सांगितले.त्यावेळी सपोनि रविराज फडणीस यांनी सर्वांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी जत पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments