आंसगी जतमध्ये मुलाकडून वडिलाचा खून; संशयित मुलगा ताब्यातजत/प्रतिनिधी: आसंगी जत (ता. जत) येथे वडीलांनी बाहेरगावी जाण्यासाठी पैस न दिल्याच्या कारणावरून मुलांनेच जन्मदात्या वडीलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडला आहे. देवाप्पा खिराप्पा मोडे (वय 55) असे मयत वडीलाचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा प्रविण देवाप्पा मोडे (वय 26) याला उमदी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 
        पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आसंगी जत येथे देवाप्पा खिराप्पा मोडे हे पत्नी, संशयित आरोपी मुलगा असे तिघे राहत होते. मुलगा प्रवीण मोडे याचा वडिलांबरोबर बुधवारी रात्री लग्न का करत नाही, बाहेरगावी जाण्यासाठी एक हजार रुपये दे या कारणावरून वाद झाला, त्यात प्रविणने आईच्या समोरच बापावर चाकूने सपासप वार केले, काठीनेही मारहाण केली. पत्नी कस्तुरा हिने आराडाओरड केला, आवाज ऐकून शेजारी राहणारे चुलते मधुकर, रखमाजी हे वाद सोडविण्यासाठी आले. त्यांनाही प्रविणने चाकूचा धाक दाखविला. मधुकर यास काठीने मारहाण केली. आरडा ओरड्यामुळे लोंकाची गर्दी जमली. गर्दी बघून प्रविण घाबरुन घराच्या दरवाजाला आतून कडी लावून लपून बसला. वडील देवाप्पा मोडे यांना उपचारार्थ नेहत असताना वाटेत मृत्यू झाला. घटनेची माहिती उमदी पोलीस ठाणेस कळविण्यात आली. रात्री एक वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित प्रविण मोडे यास ताब्यात घेतले आहे. 
        गुरुवारी सकाळी जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक नामदेव दांडगे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments