वनपाल गणेश दुधाळ यांनी घोणस जातीच्या सापास दिले जीवदान


जत/प्रतिनिधी: जत नियत क्षेत्रातील मौजे येळदरी येथील वाघमारे सर यांच्या शेत तलावात घोणस जातीचा साप पाण्यात पडला असल्याची माहिती जत वनविभागास मिळताच वाघमारे यांच्या शेततळ्यात पडलेल्या घोणस जातीच्या सापास सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागस यश आले.

        अधिक माहिती अशी की, येळदरी ता. जत येथील वाघमारे यांच्या शेतातील शेततळ्यात घोणस जातीचा साप पाण्यात अडकल्याचे वनविभागास कळविण्यात आले. यावेळी जत वनविभागाचे वनपाल गणेश दुधाळ व वाळेखिंडी चे वनपाल प्रकाश गडदे यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनी घोणस सापाला जिवदान दिले व यशस्वीरीत्या बाहेर काढले. त्या नंतर त्या सापास जवळच असलेल्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. या कामगिरीबद्दल येळदरी परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments