जत येथील आशा सेविकांना विश्वजितेश फाउंडेशन कडून छत्री वाटपजत/प्रतिनिधी: सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव खुप मोठ्या प्रमाणात असताना तसेच कोरोनाशी लढा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहून, प्रत्येक रुग्णाच्या घरो-घरी जाऊन आपला जीव धोक्यात घालून, जण सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी कोरून काळात खूप मोलाचे काम केले आहे. तसेच आता मान्सूनही दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर "आरोग्यदूत" म्हणून आशा सेविका प्रत्येक गावात फिरुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविका आपली भूमिका पार पाडत आहेत. या परिस्थितीत आशा सेविकांना छत्रीरूपाने आधार मिळावा. याकरिता आ.मोहनराव कदम व डॉ.शिवाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ना.डॉ.विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना छत्री वाटपाची मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज विश्वजितेश फौंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यातील आशा सेविकांना आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले. 

       यावेळी या कार्यक्रमासाठी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, बिडीओ अरविंद धरणगुत्तीगर, जि.प.सदस्य सरदार पाटील, काँगेस तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, विक्रम फौंडेशनचे तालुका अध्यक्ष युवराज निकम, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, आकाश बनसोडे, प्रदीप नागणे, अजित मुळीक, महावीर भोरे, महेश जगताप, विनायक रुपनर यांच्यासह विश्वजितेश फौंडेशनचे पदाधिकारी, आशा सेविका व गटप्रवर्तक माता-भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments