घोलेश्वर मध्ये शेळीच्या गोठ्यात लांडग्याच्या हल्ल्यात; दोन बोकड एक शेळी ठारजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील घोलेश्वर येथे सैनप्पा गुंडा तांबे (रा. तांबेवाडी, घोलेश्वर) यांच्या वाड्यामध्ये पहाटेच्या सुमारास लांडगा घुसल्याने, लांडग्याने वाड्यातील दोन बोकड व एक शेळीवर हल्ला करून कोथळा बाहेर काढल्याने शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. यामध्ये तांबे यांचे तीस हजाराचे नुकसान झाले आहे.

       अधिक माहिती अशी की, तांबेवाडी, घोलेश्वर येथिल सैनप्पा तांबे हे आपल्या मेंढ्या व शेळ्या वाडयात कोंडतात. पहाटे ३ वाजताच्या सुमारास लांडगा वाड्यात घुसून आतील जनावरांवर हल्ला केल्याने दोन बोकड व एक शेळी ठार झाली आहे. यामध्ये तांबे यांचे मोठे नुकसान झाले आहे. आशा प्रकारचे हल्ले रोज दिवसाढवळ्या मेंढपाळांना सहन करावे लागतात. लांडग्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील मेंढपाळ करत आहेत. 

        या घटनेची माहिती मिळताच तलाठी स्वप्नील घाडगे, वनपाल गडदे, वनरक्षक मुसळे, पशुवैद्यकीय कर्मचारी खांडेकर यांनी भेट देत पंचनामा केला आहे. यावेळी ग्रा प सदस्य जमीर मुजावर, हुसेन नाईक, फारूक नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments