जत येथील शिंदे परिवाराकडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपणजत/(जॉकेश आदाटे): जत येथील शिंदे परिवाराकडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखणारा उपक्रम शिंदे परिवाराकडून राबवण्यात आला. त्यामुळे शिंदे परिवाराचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शिंदे परिवाराकडून शिवराज्याभिषेक दिनी जत येथील अंबाबाई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे शिंदे परिवारातील युवा पिडीने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी प्रशांत शिंदे, अक्षय शिंदे, अमर शिंदे, रोहित शिंदे, ऋतिक शिंदे, समर्थ शिंदे, प्रियांका शिंदे, मनाली शिंदे, नेहा शिंदे उपस्थित होते. येणाऱ्या काळात प्रत्येक युवा पिढीने असे स्तुत्य उपक्रम राबविले पाहिजेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. व येणारी पिढी एक आदर्श पीडी घडली जाईल. असे प्रशांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.Post a Comment

0 Comments