दोन दिवसात स्वीकृत नगरसेवकाचे नाव जाहीर करा नगरसेवक विजय ताड यांचा इशारा


जत/प्रतिनिधी: दोन दिवसात स्वीकृत नगरसेवकाचे नाव जाहीर करा, अन्यथा वेगळा विचार करु, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते तथा भाजपचे नगरसेवक विजय ताड यांनी दिला आहे.

        यावेळी बोलताना विजय ताड म्हणाले की, वास्तविक पाहता बुधवारी झालेल्या बैठकीत स्वीकृत नगरसेवकाचे नाव जाहीर करणे गरजेच होत. परंतु ते करण्यात आले नसून योग्य वेळी नाव जाहीर करणार, असे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जाहीर केले आहे. परंतु ते आम्हाला मान्य नसून दोन दिवसात नाव जाहीर करणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही वेगळी चूल मांडून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भूमिका मांडू, असा इशारा नगरसेवक विजय ताड यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments