लॉकडॉऊन उठताच आरपीआयच्यावतीने जतमध्ये आंदोलन -संजय कांबळे

जत शहराचा भौतिक विकास व मराठा व दलित समाजाच्या प्रश्नासाठी प्रांताधिऱ्याना निवेदन


जत/प्रतिनिधी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी जत यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन लॉकडाऊन उठल्यानंतर  धरणे आंदोलन करण्याबाबत संजय कांबळे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली  जत  प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. यावेळी आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

          मराठा समाजातील बरीचशी जनता आर्थिक परिस्थितीने गरिबीची असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे. सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने खाजगी मेडिकल दुकानदार व लॅबरोटरी वाले गोरगरिबांना जादा दराने आकारणी करून लुटीचा प्रकार चालू आहे. तरी औषधे तपासणी  शासनाच्या दरात मिळावेत. कोरोना वरील लसीचे ऑनलाईन बुकिंग करून घेण्याची पद्धत ग्रामीण भागातील बऱ्याचशा लोकांना अवगत नसल्यामुळे कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासन स्तरावरील निर्णय घेऊन, कोरणा चे लसीकरण घरोघरी जाऊन करावे. तालुक्यातील बाज ग्रामपंचायतीकडे गेली पन्नास वर्षे झाले अनुसूचित जाती चे सरपंच पदासाठी आरक्षण मिळालेले नाही ते मिळावे, लोहगाव गावात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका श्रीमती बाबर या मागासवर्गीय कुटुंबांना औषध गोळ्या देताना व तपासताना वेगळी वागणूक देतात त्यांच्यावर ती चौकशी करून कारवाई व्हावी. तसेच वायफळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती दामसे माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती देत नाहीत. शिवाय ग्रामपंचायत मध्ये येणारा जाणाऱ्या शेतकरी व नागरिकांना उद्धट व अरेरावीची भाषा वापरतात त्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी, त्याचबरोबर जत शहरातून जाणारा विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील असलेली राजकीय बडी मंडळी व बडी धेंडे यांची अतिक्रमणे दूर करुन रस्ता रुंद करावा व शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोड बायपास रस्ता करावा, हा रस्ता सध्या राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. विजापूर गुहागर असे या राष्ट्रीय महामार्गाचे नाव असून जत शहरातून जाणारे या रस्त्याची रुंदी ही 24 मीटर म्हणजे 80 फूट इतकी प्रस्तावित असताना या महामार्गाचे जत शहरातील रस्त्याचे काम सुरू करत असताना या रस्त्याच्या प्रस्तावित 24 मीटर आंतरा ऐवजी जत शहरातील राजकीय मंडळी व बडी धेंडे यांचे अतिक्रमण येत असल्याने त्यांनी सुरुवातीपासून या रस्त्याला विरोध केला आहे. या राजकीय मंडळी कडून व बड्या धेंडांच्या कडून या कामाला अतिक्रमणे दूर करण्याला विरोध होऊ लागल्याने संबंधित राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाने अतिक्रमणधारकांना रस्त्यावरील 24 मिटर आतील अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटीस यापूर्वी दिलेले आहेत. परंतु या नोटीसला न जुमानता येथील अतिक्रमित राजकीय मंडळ व बडी धेंडे यांनी प्रस्तावित रस्त्याची रुंदी 24 मीटर असतानाही या रस्त्यावरील आपली अतिक्रमणे न काढता  ती वाचवण्यासाठी जत भूमी अभिलेखा कार्यालयाकडे सिटीसर्वे प्रमाणे रस्त्याचे माप मोजून संबंधित राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे अधिकारी यांच्यावर दबाव आणून रस्त्याची नियमबाह्य कामे करून घेतली आहेत. या नियमबाह्य कामाची व यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण विभागाने प्रस्तावित केलेल्या 24 मीटरचा हा रस्ता जत शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर हा महामार्ग सध्या 18 ते 20 मीटर इतका अरुंद आहे. त्यातच या वीस मीटर रस्त्याच्या रुंदीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला गटारी व प्लेविंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच स्ट्रीट लाईट बसवण्यात येत आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच अरुंद होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण होऊन वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मोठी मनुष्यहानी होणार आहे. तसेच जत शहरातून जाणाऱ्यां या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे मधोमध अर्धा मीटर रुंदीचे डिव्हायडर बसविण्याची जबाबदारी जत नगर परिषदेने घेतली असून त्यांनी लवकरात लवकर रस्ता दुभाजक बसवण्याचे काम सुरू करावे अशी मागणी केली आहे. तसेच रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेल्या गटारीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ती अतिक्रमणे ताबडतोब दूर करावीत, तरी प्रशासनाने संबंधित प्राधिकरणने जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाची प्रस्तावित 24 मीटर रुंदी का कमी केली. याची उच्चस्तरीय समिती नेमून समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संजय कांबळे जिल्हाध्यक्ष यांनी केली

        यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, किशोर चव्हाण, विनोद कांबळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुभाष कांबळे, तालुका सरचिटणीस प्रशांत ऐदाळे, शहराध्यक्ष संजय विलास कांबळे, तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे, मातंग आघाडी तालुका उपाध्यक्ष सुनील गुळे, लोहगाव ग्रा.प.सदस्य दीपक मागाडे व इतर नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments