बेरोजगार उमेदवारांसाठी 16 व 17 जूनला ऑनलाईन रोजगार मेळावा

आयटीआय, डिप्लोमा, एसएससी, एचएससी, पदवीधर व पदव्यूत्तर उमेदवारांसाठी 278 पदे उपलब्धसांगली: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 16 व 17 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा न चुकता लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

 ऑनलाईन रोजगार मेळाव्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील, आयटीआय सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, टर्नर, मशिनिष्ट, फिटर, वेबसाईट डेव्हलपर, मोल्डर, ग्रायंडर ऑपरेटर, सेल्स ऑफिसर, एलआयसी इन्शुरन्स ॲडव्हायझर / एजंट, फायनान्सियल ॲडव्हायझर, सेल्स असोसिएट व शिकाऊ उमेदवारीसाठी ट्रेनी इत्यादी पदासाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच आयटीआय, डिप्लोमा, एसएससी, एचएससी, पदवीधर व पदव्यूत्तर उमेदवारांसाठी एकूण 278 पदे आहेत. यापैकी 160 पदे आयटीआय कोर्स पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ॲप्रेटिंशिप साठी आहेत व उर्वरित 118 पदे ही नियमीत भरती करण्यासाठी वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री. करीम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments