आमदार सावंत यांच्या हस्ते तालुक्यातील विविध रस्ते कामाचे भूमिपूजन


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यात मंजूर असलेली १० रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ व भूमिपूजन आज आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

         मुख्यमंत्री व पंतप्रधान सडक योजना व आमदार स्थानिक निधीतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. जुना राम १२५ ते तिप्पेहळळी इजीमा १८४ रस्ता सुधारणा करणे, रेवणाळ ते रेवणाळ रस्ता, शेगाव ते चपरासवाडी रस्ता, शेगाव ते अंतराळ रस्ता सुधारणा करणे, शेगाव ते पाटील व्हनमाने वस्ती सुधारणा करणे, बागलवाडी ते काशिलिंगवाडी रस्ता सुधारणा करणे, जत तालुक्यातील वाळेखंडी ते महादेवखडी डे जाणारा रस्ता मध्ये फरशी पूल बांधणे, वाळेखिंडी ते जाधववाडी ग्रामा ५३ सुधारणा करणे, बेवनूर ते शिंदे काळवळ मळा रस्ता, मौजे प्रतापूर ता.जत येथील मायक्का मंदिरासमोर ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे, अंकले बाज कंठी ते खांडसरी रस्ता मध्ये अंकले गावाजवळ लहान पूल बांधणे, डफळापूर ते सिंगणापूर रस्ता सुधारणा करणे, डफळापूर ते जायगव्हान रस्ता हद्द, डोर्ली हद्द डफळापूर रस्ता व डफळापूर गावाजवळ लहान पूल बांधणे, जिरग्याळ ते शेळकेवस्ती रस्ता करणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी सरपंच मारुती पवार, युवा नेते नाथा पाटील, नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्यासह गावातील सरपंच सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments