तालुक्यातील संघटन बांधणीसाठी मी स्वतः तुमच्यासोबत कार्यरत राहणार; विराज नाईक जत येथे राष्ट्रवादीची संवाद बैठक


जत/प्रतिनिधी: युवकांचे संघटन पक्षासाठी महत्त्वाचे आहे, आणि युवक हा पक्षाचा कणा आहे, येत्या काळात युवकांचे संघटन बांधणीसाठी युवकांचे मुलाखती घेऊनच नियुक्ती करण्यात येणार आहेत. तालुक्यातील संघटन बांधणीसाठी मी स्वतः तुमच्यासोबत कार्यरत राहणार आहे व त्यासाठी कोणतीही अडचण असल्यास प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत मी असणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी नवनियुक्त जिल्हा युवक अध्यक्ष विराज नाईक हे जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या आढावा बैठकीत बोलत होते.

      यावेळी नवनियुक्त जिल्हा युवक अध्यक्ष विराज नाईक, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिताताई जाधव यांचे स्वागत करण्यात आले.

      यावेळी बोलताना महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिताताई जाधव म्हणल्या की, महिलांना बळ देणे ही आपल्या पुरुष पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, मी तळागाळातील महिलांशी स्वतः संपर्क साधणार आहे, मला आपल्या साथीची गरज आहे, आपण सर्वांनी पुढाकार दिलात तर आपण नक्कीच एक चांगलं संघटन उभारू शकतो, माझी पूर्ण तयारी आहे, फक्त आपली साथ पाहिजे.

        यावेळी सुरेशराव शिंदे म्हणाले की, पक्षाचे संघटन वाढीसाठी आम्ही सर्वच तालुक्यातील नेतेमंडळी एकत्र झालो आहोत. आमच्यापैकी कोणाचाही गट तट नाही. आम्ही सर्वच एकदिलाने कामाला लागलो आहोत, फक्त आपण आजवर जसे सहकार्य आम्हा सर्वांना वरिष्ठ पातळीवरून करत आले आहात, तसेच यापुढेही करा, नक्कीच तालुका लवकरच राष्ट्रवादीमय करून दाखवू. कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगू नका, काही अडचण आल्यास आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत नक्कीच असणार आहोत.

         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष  अविनाश काका पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, अल्काताई माने, युवती जिल्हाध्यक्षा पूजाताई लाड, OSD अमोलजी डफळे, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती शिवाजी शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, वक्ता विभाग जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, सरचिटणीस सचिन होर्तिकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ. पराग पवार, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे, तालुका महिलाध्यक्षा मिनाक्षीताई अक्की, श्रद्धा शिंदे, जेष्ठ नेते सिद्धू शीरशाड, वक्ता विभाग तालुकाध्यक्ष राहूलसिंह डफळे, राजेसाहेब डफळे, आवंढी सरपंच आण्णासाहेब कोडग, शशिकांत कोडग, प्रतापराव शिंदे, इम्रान गवंडी, विकास लेंगरे, राजू मुल्ला, हेमंत खाडे, पवन कोळी, संतोष देवकर, रियाज शेख, आवंढी ग्रामस्थ व तालुक्यातील इतर राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते,

      सूत्र संचालन लक्ष्मण कदरे व शफीक इनामदार यांनी केले तर आभार जयंत भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments