जत येथे पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने केले पेट्रोल पंपावर आंदोलन


जत/प्रतिनिधी: एकीकडे कोरोनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हैराण झाले आहे. लोकांचा मृत्यू दर वाढतो आहे. अश्यात जनतेला जगणे कठीण बनले असताना केंद्र सरकार सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून आणखीन त्यांना रसातळाला नेत आहे. केंद्राने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी करत जत तालुका काँग्रेस कमीटीने आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी या दरवाढीचा निषेध नोंदवत मोदींच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. प्रदेश काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार राज्यभर काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात आंदोनल केले. 

        जत काँग्रेस कमीटीने शहरातील बिज्जरगी पेट्रोल येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आदोलन करण्यात आले. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अप्पराय बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडग,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,युवराज निकम,अशोक बनेनवर, महादेव कोळी,निलेश बामणे,आकाश बनसोडे,यश सावंत,राजू यादव यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

       यावेळी आ. विक्रम सावंत म्हणाले की, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून इंधनाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. आठ दहा वर्षापूर्वी पेट्रोल ५८ तर डिझेल ४८ होते, हेच दर आता शंभरी पार करत आहेत . वास्तविक इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच घटकांवर होतो. यामुळे महागाई आपोआप वाढते. याचा सगळा बोजा सामान्य जनतेवर पडतो आहे. अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून कोरानाच्या संक्रमणामुळे लोक त्रस्त आहेत. आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. रोजीरोटीचा प्रश्न जटील बनला असताना, रोज होणारी ही दरवाढ लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. केंद्राने ही दरवाढ मागे न घेतल्यास काँग्रेस आणखीन तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही आ. सावंत यांनी दिला.


Post a Comment

0 Comments