जत शहरात आगामी कर्नाटक बेंदराचे पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी । जत पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण । सायंकाळी चार नंतर दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाईचा ईशारा


जत/प्रतिनिधी: कोरोनाचे पार्श्वभूमीवर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत दुपारी चार वाजलेनंतरही जत नगरपरिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच अस्थापना सुरू राहील्याने पोलीस प्रशासनाने कल जत शहरातील बाजारपेठेत वाहनासह संचलन करित व्यापाऱ्याना त्यांची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले व सुरू असलेली काही दुकाने सिल करून दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा दिला. 

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाचे बाबतीत सांगली जिल्हा हा तिसरे टप्प्यात येत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दि.28 जूनपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच अस्थापना या सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु जत शहरात मात्र आगामी कर्नाटक बेंदराचे पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर नागरिकांकडून कोरोनाचे कोणत्याच नियमांचे पालन केले जात नव्हते. नागरिकांच्या व व्यावसायिक यांच्या तोंडाला मास्क नव्हते, त्यांच्याकडून सामाजिक अंतराचे पालन केले जात नव्हते. शहरात सर्वत्र नागरिकांची व वाहनधारकांची गर्दीच गर्दी दिसून येत होती. अशाने कोरोना रूग्णांची आटोक्यात येत असलेली संख्या परत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

          अशातच प्रशासनाने सर्वच अस्थापनांना अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली असतानाही जत शहरात मात्र सायंकाळी चार नंतरही सर्वच अस्थापना सुरू होत्या व त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत होती.

          जतचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस प्रशासनाने सर्व सुरू असलेल्या अस्थापना बंद करण्यासाठी व शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस वाहनासह जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत संचलन केले, व ध्वनिक्षेपकावरुन सर्वांना अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन केले व जे दुकानदार आपली दुकाने बंद न करता उघडी ठेवतिल अशी दुकाने प्रशासनाचेवतीने सिल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments