जत येथे मोटरसायकल चोरणाऱ्या तरुणास अटक । पाच मोटरसायकली जप्त । जत पोलिसांची कारवाई


जत/प्रतिनिधी: जत शहरात मोटरसायकली चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या एका तरुणास अटक करून, या तरुणाकडून चोरी केलेल्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे. विशाल बाळु बामणे (वय २३ रा. विठ्ठलनगर जत) असे या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई जत पोलिसांनी केली आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की, जत पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असलेने. मोटरसायकल चोरीला आळा बसावा या हेतूने, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या सूचनेनुसार शहरात गस्त घालने सुरू होते. दरम्यान आरोपी विशाल बामणे हा शहरातून संशयितपणे फिरत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता. त्याने यापूर्वी ५ मोटरसायकली चोरल्या असून. आजही मोटरसायकली चोरी करण्यासाठी फिरत असल्याचे सांगितले. त्याचेकडून २ बुलेट, एचएफ डीलक्स मोटर सायकल १, स्प्लेंडर कंपनीची १ मोटर सायकल, महींद्रा चॅम्पीयन सायकल १ असे एकुण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      ही कारवाई पोलीस नाईक प्रवीण पाटील, केरबा चव्हाण, सतिश माने, संतोष कुंभार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments