संख अप्पर तहसीलदार व तलाठी 2 लाख 30 हजारांची लाच घेताना लाचलूचपतच्या जाळ्यात । अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे फरार तर तलाठी विशाल उदगिरे जाळ्यात

अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे
तलाठी विशाल उदगिरे

जत/प्रतिनिधी: संख ता. जत येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळ व कोळगिरी गावचे तलाठी विशाल उदगिरे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत जाळ्यात अडकले. अप्पर तहसीलदार म्हेत्रे फरार असून तलाठी उदगिरे यास लाच स्वीकारल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार हे त्यांच्या वाहनातून माती वाहतूक करीत असताना त्यांची वाहने संखचा अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळचा तलाठी उदगिरे यांनी अडवून कारवाई करण्यासाठी संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी लावली होती. या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी व वाहने सोडण्यासाठी अप्पर तहसीलदार म्हेत्रे व उदगिरे यांनी तक्रारदाराकडे २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतची तक्रार, तक्रारदारांनी ५ जून रोजी सांगली येथील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात दिली होती.
या तक्रारीनुसार दि. ९, ११ व १६ जून रोजी तसेच आज दि. २२ जून रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता. त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनावर कारवाई न करण्याकरिता व वाहने सोडण्याकरिता अप्पर तहसीलदार म्हेत्रे व माडग्याळचा तलाठी उदगिरे याने तक्रारदाराकडे २ लाख, ५० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
आज दि. २२ जून रोजी संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सापळा लावण्यात आला. अप्पर तहसीलदार म्हेत्रे व तलाठी उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून अप्पर तहसीलदार म्हेत्रे याच्या सांगण्यावरून तलाठी उदगिरे याने तक्रारदाराकडून २ लाख ३० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले. अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हा फरार झाला आहे. त्या अनुषंगाने म्हेत्रे व उदगिरे यांच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
        सदरची कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव, अप्पर पोलीस उपायुक्त सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे व प्रशांत चौगुले, पोलीस अंमलदार अविनाश सागर, अजित पाटील, संजय संकपाळ, राधिका माने, संजय कलगुटगी, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली आहे.

  •         नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयोन दुरध्वनी क्रमांक ०२३३ / २३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच अप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments