जत मध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई ८४ हजाराचा मद्यसाठा जप्त । चौघांविरोधात गुन्हे दाखल


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात विकेंड लाँकडाऊन कालावधीत विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या कडून ८४ हजार ९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, मा.जिल्हाधीकारी सो यांचे आदेशानुसार शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व मद्याची दुकाने बंद करणेचे आदेशाने शासनाने दिले होते. परंतु अमीर गौसपीर व्हसट्टी रा. करजगी ता.जत, भिमशा तम्माराया कोळी, सिद्राया सिध्दाप्पा कोळी, परशुराम मळसिध्दाप्पा कोंजारी तिघे रा. उटगी ता.जत हे जिल्हाधीकारी यांचा आदेश डावलून मद्य विक्री करत असताना  राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरीक्षक सांगली सी.वाय.वळसे, दत्तात्रय चव्हाण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व संजय वाडेकर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जत यांना तपासणी करताना सापडल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली आहे. या कारवाईत देशी व विदेशी मद्याचे एकुण २२ बॉक्स व ५ लिटर ताडी जप्त करण्यात आले आहे. त्याची किमंत ८४ हजार ९२ रुपये इतकी आहे.

कोरोणाचा वाढत्या प्रादुर्भावमुळे व लॉकडाऊन असताना देखील. तसेच जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप बंदी असताना देशी दारूचे बॉक्स कुठून आले. यामुळे संबंधित दुकानदारावर्ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments