कोंतेवबोबलाद येथे मानव मित्र संघटना धावली मदतीला


जत,प्रतिनिधी: कोंतेवबोबलाद ता.जत येथील दत्ता परीट यांच्या घर व हॉटेलला पहाटे चार च्या सुमारास आग लागून अडीच लाखांचे नुकसान झाले याची माहिती मिळताच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना .ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मानव मित्र संघटना मदतीस धावली. 

       कोंतेवबोबलाद येथील पोलीस चेक पोस्ट जवळ दत्ता परीट यांच्या घर व हॉटेलला पहाटेच्या चार च्या सुमारास आग लागून घरामधील संसार उपयोगी साहित्य, १ तोळे सोने, कपडे, हॉटेल मधील फ्रीज, धान्य असा एकूण अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी मानून ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी मदत केली. 

       यावेळी कोंतेवबोबलाद गावचे सरपंच पुंडलिक कांबळे, रमेश माळी, सोहन धुमाळ, ऋषी दोरकर, शंकर सावंत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments