कंठी येथे आमदार सावंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजनजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील कंठी येथील विविध विकास कामाचे भूमीपुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जानकर वस्ती येते अंगणवाडी शाळा खोली, जिल्हा परिषद शाळा खोली, कंठी ते बागेवाडी रस्ता डांबरी करणं व हनुमान मंदिर समोर सभामंडप या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

          यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जि.प.सदस्य महादेव पाटील, घुगरे सर, श्रीनिवास पाटील, माजी सरपंच तुकाराम इरकर, माजी सरपंच बिराप्पा पाटील, ग्रा.प.सदस्य रवी पाटिल, मोठे सर, सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments