सलून व्यवसाय पूर्ववत सुरु करा; जत तालुका नाभिक समाज संघटनेची मागणी


जत,प्रतिनिधी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व्यवसायवरती घालण्यात आलेले कठोर निर्बंध प्रशासनाने रद्द करावेत व सलून व्यवसाय पूर्ववत सुरु करणेबाबत जत तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने जत तहसीलदारासो याना निवेदन देण्यात आले.

          निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण राज्यात ५ एप्रिल २०२१ पासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. या मध्ये सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद ठेवणे बाबत निर्णय घेतला आहे. वास्तविक सलून व्यवसाय करणारा कारागीर आर्थिक अडचणीमुळे अगोदरच डबघाईस आला आहे. या कारागिरांची पूर्णतः उपजीविका या व्यवसाय वर अवलंबून आहे. सलून दुकान चे भाडे, वीज बिल, कर्जाचे हप्ते तसेच कुटुंबाची उदार निर्वहाची जबाबदारी या सर्व गोष्टी सलून बंद केलेस पार पाडणे अशक्य आहे. मागील लॉकडाऊन मध्ये बऱ्याच सलून कारागिरांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केलेचे आपणास ठाऊक आहे. आपण सलून व ब्युटीपार्लर बंद ठेवणेच निर्णय मागे घ्यावा व सलून दुकान मध्ये गर्दी न करण्याच्या अटीवर सलून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी समस्त नाभिक समाजाची मागणी आहे.

         मागील लॉकडाऊन मध्ये सलून कारागीर प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडून हि कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. यावेळी व्यवसाय बंद ठेवणे सलून कारागिरास शक्य नाही. तरी या मागणीचा गांभीर्याने विचार करून सलून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे वतीने नाईलाजाने विविध प्रकारे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी बसवराज गंगाधरे जत तालुका अध्यक्ष, महेश जाधव तालुका उपअध्यक्ष, श्रीधर वाघमारे जत शहर अध्यक्ष, राम बनकर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या निवेदनावर साह्य आहेत.

Post a Comment

0 Comments