कोतेंवबोबलाद येथे घर, हॉटेलला आग लागून अडीच लाखाचे नुकसान


कोतेंवबोबलाद (ता.जत) येथील दत्ता हरीसक परिट यांच्या घर,हाॕटेलला अचानक आग लागून जळून खाक झाले

जत,प्रतिनिधी: कोतेंवबोबलाद (ता.जत) येथील दत्ता हरीसक परिट यांच्या राहत्या छप्पर वजा पत्रा घर,शेजारील  हाॕटेलला अचानक आग लागली.यामध्ये २ लाख ५० हजार रुपयेचे नुकसान झाले. आगीत रोख रक्कम, गँस, फ्रीज, कपाट, संसारपयोगी साहित्य, धान्य, हॉटेल साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवार पहाटे ४ वाजता घडली. 

          याबाबतची अधिक माहिती अशी कि, पूर्व भागातील कर्नाटक सीमेवरील कोतेंवबोबलाद येथे गावापासून पूर्वेला अर्धा किलोमीटर अंंतरावर अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर लगत दत्ता परीट कुंटुंंबासह छप्पर वजा पत्राशेडमध्ये रहातात. आई- वडील शेेेतात रहातात त्यांचे राहत्या घरामध्येच हॉटेल व्यवसायही करतात. हॉटेलसाठी दोन दिवसापूर्वी माल भरला होता. शनिवारी हॉटेल बंद करुन गेले होते.दत्ता परीट व त्याची पत्नी शेजारील पत्राशेड घराबाहेर झोपले होते.

          रविवारी पहाटे ४ वाजता अचानक हॉटेल, पाठीमागील खोलीला आग लागली. पहाटे वारा असल्याने काही कळायच्या आत आग भडकली. त्यामुळे आग विजवता आली नाही. आगीत रोख रक्कम, संसारपयोगी साहित्य, गँस, फ्रीज, कपाट, भांडी, धान्य, हॉटेलचे साहित्य जळून खाक झाले. यामध्ये अडीच लाखाचे नुकसान झाले.

          घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तलाठी दीपक ठाकरे यांनी पाहणी केली. पोलीस पाटील श्रीहरी पाटील, सरपंच पुंडलिक कांबळे, तलाठी दीपक ठाकरे, उपसरपंच शंकर सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा केला.

  "आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवसाय उभारण्यासाठी मदतीची गरज आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावी." अशी मागणी दत्ता परीट यांनी केली.

Post a Comment

0 Comments