राजे रामराव महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत


जत,प्रतिनिधी: राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिक्षण घेणारी कु. भाग्योदय बिसलप्पा कंगोनी शिवाजी विद्यापीठाकडून मार्च 2020 मध्ये बी.ए.परीक्षेत फिलॉसोफी या विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ज्ञानेश्वर मुळे एक्सलन्स पारितोषिक व गुरुवर्य श्री.एस पी.दाते पारितोषिक तर कु. कोमल श्रीरंग शितोळे हिला बी.ए.परीक्षेत इंग्रजी या स्पेशल विषयामध्ये SC/ST विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आल्याबद्दल शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या तर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळालेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत राजे रामराव महाविद्यालयाने आपले स्थान निश्चित केले आहे.

अतिशय सामान्य परिस्थिती व कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना कंगोनी व शितोळे यांनी यश संपादन केले आहे. या अगोदरही राजे रामराव महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना नेहमी महाविद्यालयाकडून सहकार्य मिळत असते. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश एस.पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, डॉ.आप्पासाहेब भोसले, प्रा. सिद्राम चव्हाण, प्रा. आर. डी. करांडे, प्रा. के. के. रानगर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments