आ.विक्रमसिंह सावंत यांची परीट कुटूंबास मदत


जत,प्रतिनिधी: कोतेंवबोबलाद ता.जत येथे दत्ता परिट यांचे घर व हॉटेलला आग लागून फार मोठे नुकसान झाले आहे. यावेळी त्याना संसार उपयोगी साहित्य मदत करताना आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत. 

       अधिक माहिती अशी कि, कोतेंवबोबलाद येथे गावापासून पाचशे मीटर पूर्वेला विजयपूर रोड लागत असलेले दत्ता  परीट यांचे छप्पर वजा पत्र राहत्या घरामध्येच हॉटेल व्यवसाय करत होते. रविवारी पहाटे चारच्या दरम्यान अचानक आग लागून  अडीच लाखापर्यंत जळून नुकसान झाले आहे.आ सावंत यांनी नुकसानीची पाहणी करत शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

        यावेळी रामपूर सरपंच कुंडलिक कांबळे, माजी सरपंच मारुती पवार, ग्रा.प.सदस्य रमेश माळी मुरलीधर जगताप, पोलीस पाटील श्रीहरी पाटील, शंकर सावंत, महादेव बिराजदार, बाळू पवार, शामु नरळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments