तुकाराम बाबा महाराज याना एन यु जे महाराष्ट्र -२०२१ पुरस्काराने सन्मानितजत,प्रतिनिधी:- चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जनरारालिस्ट यांच्यावतीने 'एन यु जे महाराष्ट्र -2021' हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ. सरिता लिंगायत वास्तू शास्त्र तज्ञ व संजय धुमाळ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मानव अधिकार संघटना हे यांच्यासमवेत उपस्थित होते.

          तुकाराम बाबा महाराज यांनी धार्मिक व सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तुकाराम बाबा महाराज हे कायम धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजजागृती करण्याबरोवरच जत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी संख ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली. जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील पहिली खाजगी चारा छावणी काढून पशुधन वाचवले. २५० हुन अधिक जणांना पाण्याच्या टाक्याचे वाटप केले. कोरोना काळात साडेसात हजार मास्क, साडेपाच हजार कुटूंबियांना जीवनावश्यक किट, २२ हजाराहून अधिक जणांना थेट घरोघरी लॉक डाऊन काळात भाजीपाला वाटप केला. गोंदिया येथे चालत निघालेल्या तरुणांना त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या गावी पोहचवले. तालुक्यातील प्रतापूर, उटगी, येळदरी, खैराव, टोणेवाडी आदी गावात घर जळाल्याच्या घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांना मदतीचा हात देत रोख रक्कम व संसार उपयोगी साहित्यांचे वाटप केले.

         त्यांच्या या कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जनरारालिस्ट यांच्यावतीने 'एन यु जे महाराष्ट्र -2021' हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शीतल करदेकर राज्य अध्यक्षा एन. यु. जे. महाराष्ट्र, डॉ. सुभाष सामंत (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष) लक्ष्मणराव खटके (सांगली जिल्हा अध्यक्ष) अरुण राव इंगवले (जि.प. सदस्य कोल्हापूर,) लक्ष्मण आढाव (सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष), विनय कुमार पाटील, शेखर घोंगडे, भुपेश कुंभार, जितेंद्र पाटील, पोपट वाकसे, सुनील सुर्यवंशी आदीजण प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments